ब्युरो टीम : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. ही रॅली आज, सोमवारी (12 ऑगस्ट) नगरमध्ये दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नगर शहरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल केलेत. हे बदल आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहेत.
तसेच मनोज जरांगे यांच्या रॅलीचा मार्ग नोव्हेईकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र) घोषीत केले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
असा केलाय वाहतुकीत बदल
इम्पेरियल चौक-माळीवाडा-पंचपीर चावडी-तख्ती दरवाजा-माणिक चौक-कापड बाजार-तेलीखुंट चितळे रोड- चौपाटी कारंजा/
तसेच इम्पेरियल चौकाकडे दोन्ही बाजुने येणारी सर्व प्रकारची वाहने/वाहतुक ही खालील मार्गाने जातील
१) कायनेटीक चौकाकडुन इम्पेरियल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
कायनेटीक चौक शिल्पा गार्डन समोरुन उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील
२) पाथर्डी रोडने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
जीपीओ चौक चांदणी चौक उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील. अथवा/जीपीओ चौक कोठला एसपीओ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
३)सोलापुर व जामखेड कडुन येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
चांदणी चौक उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील अथवा / चांदणी चौक जीपीओ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
४)एसपी चौकाकडुन इम्पेरियल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
जीपीओ चौक कोठला उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील
हा आदेश शासकीय वाहने,अॅब्युलन्स, फायर ब्रिगेड,रॅलीमधील परवानगी दिलेली वाहने व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.
टिप्पणी पोस्ट करा