nashik NMC : नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची युनिसेफने घेतली दखल.



ब्युरो टीम : नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांची थेट युनिसेफने दखल घेतली आहे. वैद्यकीय विभागातर्फे मनपा  आशा सेविकांच्या माध्यमातून माता-बालक लसीकरणासाठी केले जात असलेले कार्य आणि इतरही आरोग्यसेवा कार्याला युनिसेफने आपल्या वार्षिक पुस्तिकेत स्थान देत कौतुकाची थाप दिली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून शहर परिसरातील नागरिकांना आरोग्य वैद्यकीय सेवा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरविल्या जातात. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून चार मोठी रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहे, तसेच ३० शहरी आरोग्यसेवा केंद्रे आणि नुकतीच सुरू करण्यात आलेली ४७ आरोग्यवर्धिनी केंद्रे व १४ आपला दवाखान्यांमार्फत नागरिकांना आरोग्यसेवा पुरविल्या जातात. रुग्णालये, दवाखान्यांमधून रुग्णांना बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण - विभागाच्या माध्यमातून विविध आरोग्यसेवा पुरविताना माता-बालक लसीकरण, कुटुंब कल्याण, किशोर स्वास्थ्य, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, एनपीसीडीसीएस, डेंग्यूसह साथरोग नियंत्रण, एनयूएचएम अशा विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांचा युनिसेफने आपल्या वार्षिक पुस्तिकेत उल्लेख करत वैद्यकीय विभागाच्या कामकाजाविषयी प्रशंसा केली आहे. आरोग्य वैद्यकीय सेवांची तटस्थपणे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी विभागामार्फत पुरविण्यात येत असलेल्या सेवांची युनिसेफने आपल्या वार्षिक पुस्तिकेत दखल घेतली आहे.या कार्याची दाखल घेऊन स्मिता झगडे,अतिरिक्त आयुक्त (सेवा)]मनपा,नाशिक यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण यांचा शाल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी ,अतिक्रमण उपायुक्त डॉ.मयुर पाटील,समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर,नगर नियोजन विभागाचे सहायक नगररचना संचालक  कल्पेश पाटील,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने