ब्युरो टीम : अखंड प्रेम, उत्साह, स्नेहभाव आणि पवित्रता घेऊन येणारा रक्षाबंधन सण आज, १९ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा होत आहे. भावा-बहिणीतील स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, यादिवशी भद्राकाल असल्यामुळे राखी बांधण्याचा मुहूर्त दुपारनंतर आहे.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, व त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ त्याच्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देऊन प्रेमानं भेटवस्तू देतो. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, तर दुसरीकडे यादिवशी भद्राकाळ देखील असणार आहे. त्यामुळे राखी बांधण्याचा नेमका मुहूर्त कोणता आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर, आज याबाबतच जाणून घेऊ.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे 5 वाजून 53 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 32 मिनिटांपर्यंत भद्राकाल आहे. त्यामुळे या काळात राखी बांधू नये. याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी सात वाजल्यापासून पंचक सुरू होत आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचकाला राज पंचक म्हणतात, व हे पंचक शुभ मानलं जाते. त्यामुळे याकाळात रक्षाबंधन साजरे करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 32 मिनिटांपासून रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत आहे.
टिप्पणी पोस्ट करा