Rakshabandhan : रक्षाबंधनाच्या दिवशी कोणकोणते शुभ योग तयार झालेत? वाचा


ब्युरो टीम : भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा रक्षाबंधन सण आज साजरा होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, यंदाचे रक्षाबंधन खूपच खास आहे. कारण यंदा रक्षाबंधन श्रावणी सोमवारी आले असून यादिवशी विविध शुभ योग तयार झालेत.

श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, व त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ त्याच्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देऊन प्रेमानं भेटवस्तू देतो.

हिंदू पंचागांनुसार श्रावण पौर्णिमा तिथी सोमवारी (१९ ऑगस्ट २०२४) पहाटे ३.०४ वाजता सुरू झाली असून आणि १९ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता समाप्त होईल. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी विविध शुभ योग आहेत. रक्षाबंधनाचा दिवस श्रावणी सोमवार असून यादिवशी श्रावणी पौर्णिमा व्रत देखील आहे. याशिवाय यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि शोभन योग तयार होत आहेत.यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांपासून रात्री ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने