Sanjay Raut : संजय राऊत म्हणतात, 'राज्यातील लाडक्या बहिणी त्या आमदारांचा पराभव करणार, कारण...'



ब्युरो टीम : 'महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी तर नगरसेवकांची किंमत ५ कोटी आणि आमच्या लाडक्या बहि‍णींसाठी १५०० रुपये देता का? तेही मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात,' असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केला. ते माध्यमांशी बोलत होते.

आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना केलेल्या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, सरकारने या योजना जाहीर केल्या आहेत, त्या योजना लाडक्या बहि‍णींसाठी नसून त्या योजना फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत. मग हे पैसे त्यांच्या खिशातून आले का? तुम्ही पैसे काढून घेणारे कोण आहात? रवी राणा यांच्या पत्नी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल, यावेळी रवी राणांचाही पराभव होणार आहे. योजनेचे पैसे परत घेऊ अशी भाषा अनेक आमदार आणि महायुतीचे नेते करत आहेत. मग हे पैसे त्यांचे आहेत का? या पैश्यावर जनतेचा हक्क आहे. १५०० रुपयांमध्ये घर चालत नाही आणि रवी राणा यांनी १५०० रुपयांमध्ये घर चालवून दाखवावं”, असंही संजय राऊत म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने