ब्युरो टीम : तुम्ही झोपताना कोणत्या दिशेला पाय करावे, हे अनेकदा ठरवत नाही. पण वास्तुशास्त्रात व्यक्तीनं कोणत्या दिशेला पाय करून झोपावे, यासाठी दिशाही निश्चित केली आहे.
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीनं झोपताना त्याचे पाय हे दक्षिण दिशेला करून झोपू नये. कारण दक्षिण दिशेला यमदूत, यम आणि नकारात्मक शक्तीची दिशा म्हणतात. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास मनामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. याशिवाय भीतीदायक स्वप्नेही पडतात. त्याचबरोबर अशी व्यक्ती निराशा आणि भीतीलाही बळी पडू शकते. ती व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं अस्वस्थ असते. तसेच वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीनं कधीही पूर्व दिशेला पाय ठेवून झोपू नये. पूर्व ही सूर्यादयाची दिशा आहे. पूर्व दिशेला पाय ठेवून झोपल्यानं व्यक्तीच्या शरीरात नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीनं झोपताना त्याच्या पायांच्या दिशेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक ग्रंथानुसारही झोपताना व्यक्तीचं डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेनं असले पाहिजे. म्हणजेच पाय हे उत्तर व पश्चिम दिशेला असले पाहिजेत. ही झोपण्याची योग्य पद्धतही समजली जाते.
टिप्पणी पोस्ट करा