TMC CUSES : क्युसेक, टीएमसी व विसर्ग म्हणजे काय? वाचा



ब्युरो टीम : पुणे जिल्ह्यातील खडकवासला, मुळशी, पानशेत, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे यासह विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्युसेक, टीएमसी, विसर्ग हे शब्द तुमच्या कानावर पडत असतील. परंतु याचा नेमका अर्थ काय, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर, याबाबतच जाणून घेऊ. 

टीएमसी 

टीएमसी हा 'थाऊसंड मिलियन क्युबिक फीट' या एककाचा संक्षिप्त रूप आहे. धरणातील पाण्याचे साठा मोजण्यासाठी हे वापरले जाते. १ टीएमसी म्हणजे १००० दशलक्ष घनफूट पाणी होय.

क्युसेक

क्युसेक हा शब्द 'क्युबिक फीट पर सेकंड' या एककाचा संक्षिप्त रूप आहे. हे धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे मापन करते. १ क्युसेक म्हणजे दर सेकंदाला एक घनफुट पाणी. धरणातून किती प्रमाणात पाणी बाहेर सोडले जात आहे, हे क्युसेकच्या माध्यमातून मोजले जाते.

विसर्ग 

विसर्ग म्हणजे धरणातून बाहेर सोडले जाणारे पाणी. पाऊस पडल्यावर धरणे भरल्यामुळे पाणी बाहेर सोडावे लागते, त्यालाच विसर्ग म्हणतात. हा विसर्ग क्युसेक किंवा टीएमसीमध्ये मोजला जातो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने