Turdal : पावसाळ्यात आरोग्यासाठी तूरडाळ कशी ठरू शकते फायदेशीर, कधी विचार केलाय?


ब्युरो टीम : पावसाळा असो की उन्हाळा,  प्रत्येक ऋतूमध्ये योग्य आहाराला खूप महत्त्व असते. पावसाळ्यात तर योग्य आहार घेण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. कारण आरोग्याच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे असते.  योग्य आहार हा चांगले आरोग्य राहण्यासाठी गरजेचा असतो. योग्य आहारात डाळीचा ही समावेश होतो. त्यातही तूरडाळ जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यामध्ये येत असते. 

तूरडाळ ही जवळपास सर्वच जणांना आवडते. काही लोकांना ही डाळ इतकी आवडते की ते दररोज खाऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का, तूरडाळ खाणे हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तूरडाळ खाण्याचे नेमके काय फायदे आहेत, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

१. तूरडाळ अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. या डाळीत लोह, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉलिक अ‍ॅसिड, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. त्याचबरोबर मॅंगनीज, झिंक, कॉपर, सेलेनियम यांसारखे घटकही यात आढळतात, ज्याच्या मदतीनं पचनसंस्था योग्य राहण्यास मदत होते. 

२. तूरडाळीत प्रथिनांबरोबरच फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरचे प्रमाण चांगले असल्याने ही डाळ पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे तूरडाळ ही आरोग्यासाठी उत्तम समजली जाते.

३. तूरडाळीत प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर ही डाळ प्रत्येक ऋतूत खाता येते. तूरडाळ सकाळ-संध्याकाळ कधीही खाऊ शकतात. बारा महिने तूरडाळ खाता येत असल्याने व ती कोणत्याही वेळी खाल्ली, तरी तिचे साईड इफेक्ट होत नसल्यामुळे ती खाण्यास अनेकांची पसंती असते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने