Vinesh Phogat : मोठी बातमी! विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा



ब्युरो टीम : ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन १५० ग्रॅमने जास्त भरलं होतं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं, व तिच्यासोबतच संपूर्ण भारतीयांच सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ज्यानंतर निराश झालेल्या विनेशने कुस्तीला अलविदा केलाय.

विनेश फोगटनं एक भावनिक पोस्ट लिहून कुस्तीला अलविदा केलं आहे. कुस्ती स्पर्धा आपल्याला आईसारखी आहे. आज मी कुस्तीशी हरले असं म्हणत विनेशने ही भावनिक पोस्ट केली आहे आणि कुस्तीमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे. 

 

विनेश फोगटची पोस्ट नेमकी काय?

“माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब। अलविदा कुश्ती २००१-२०२४ आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी” आई कुस्ती आज तू जिंकलीस आणि मी हरले. मला माफ कर आई, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आता माझ्यात नाही. माझ्यात आता तितकं बळच उरलं नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ मी तुझी कायमच ऋणी राहिन मला माफ कर.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने