Voter : स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घ्या, कारण



ब्युरो टीम : 'भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घ्या,' असे  आवाहन पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.  

भारत निवडणूक आयोगाने १ ऑगस्ट रोजी विशेष संक्षिप्त कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार ६ ते २० ऑगस्ट या कालावधीमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित नावे वगळणे, नावामध्ये, पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे, मतदान केंद्र बदलणे आदी स्वरूपाची कामे केली जाणार आहेत.

आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण साजरा करून उपस्थित अधिकारी- कर्मचारी तसेच नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात यावी. मतदार जागृती विशेष उपक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने