ब्युरो टीम : बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता गोविंदाच्या पायला बंदुकीची गोळी लागल्याची घटना घडली आहे. स्वत:जवळ असलेली बंदुक साफ करताना ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. यात गोविंदा जखमी झाला असून घटनेनंतर त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. 'एएनआय'वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलंय.
Actor and Shiv Sena leader Govinda has been taken to the nearest hospital after he was accidentally shot in the leg by his own revolver this morning, says a senior Mumbai Police official
— ANI (@ANI) October 1, 2024
More details awaited.
(file pic) pic.twitter.com/SBqnMcDgoA
एएनआयने याबाबत ट्विट केलं असून त्यानुसार मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदाला स्वत:च्याच बंदुकीतली गोळी लागली. एका कार्यक्रमासाठी जाण्याासाठी गोविंदा घरातून निघत होता. तेव्हा घरात स्वत:ची बंदुक साफ करत असताना चुकून स्ट्रीगर दाबला गेल्यानं घटना घडली. गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ लागली. त्यामुळं गोविंदा जखमी झाला. या घटनेनंतर त्याला जवळ असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा