ahmednagar crime : नेवासा फाटा येथे वाहनाची धडक देवुन खुनाचा प्रयत्न, सुपारी घेणारे मारेकरी जेरबंद



ब्युरो टीम : नेवासा फाटा येथे वाहनाची धडक देवुन खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी अहमदनगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत.  शिवनाथ ज्ञानदेव चावरे (वय 41 वर्षे, रा. जळके खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर) , ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे (वय 42 वर्षे, रा. पावन गणपती मंदीरासमोर, नेवासा), संदीप साहेबराव धनवडे (वय 39 वर्षे, रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, '16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 वा. च्या सुमारास फिर्यादी नामे श्रृती सौरभ पोखरकर (रा. बालेवाडी, स्टेडीयम जवळ, म्हाळुंगे, ता. जि. पुणे) यांचा चुलत भाऊ शंतनु पोपट वाघ हा त्याचेकडील शाईन मोटारसायकलवरुन त्याचे घरुन निघुन खडका फाटा येथील खडीक्रेशवर जात असतांना बोलेरो गाडीमधील आरोपीने कट कारस्थान करुन त्याचा पाठलाग केला, व बोलेरो गाडीने शाईन मोटारसायकलला जोराची धडक देवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वरील गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न नसल्याने व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे वर्ग करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी अटक करणेबाबत आदेश देण्यात आलेले होते. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देवुन तसेच जखमीचे घरापासुन ते घटना ठिकाणापर्यंतचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता त्यामध्ये जखमीचे मोटारसायकलचा एक पांढरे रंगाची बोलेरो गाडी पाठलाग करतांना दिसुन आली. सदर बोलेरो गाडीवरुन आरोपींचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन वरील आरोपींना अटक करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे गुन्ह्याचे कारणाबाबत सखोल व बारकाईने तपास करता आरोपी शिवनाथ चावरे याचे भाचीचे सन 2022 मध्ये जखमी शंतनु पोपट वाघ (रा. नेवासा खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर) याचेसोबत लग्न झालेले होते. मागील 01 वर्षापुर्वी शिवनाथ चावरे याचे भाचीने गळफास घेवुन आत्महत्या केलेली असुन त्या द्वेषातुन आरोपी शिवनाथ चावरे गुन्ह्याचा कट रचुन आरोपी ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे, संदीप साहेबराव धनवडे व त्यांचे इतर साथीदारांना सुपारी देवुन गुन्हा घडवुन आणला असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने