ब्युरो टीम : बदलापूर येथून मोठी बातमी समोर आलीय. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. त्याला ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असतानाही घटना घाडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावरून पोलिसांच्या गाडीवर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे.
अक्षयवर बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचाराशिवाय अन्य दोन बलात्काराचे गुन्हे होते. याबाबत कोर्टातून त्याची पोलिसांनी कस्टडी मिळवली होती.
दरम्यान, बदलापूर येथील एका शाळेतील अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर १० तास रेल रोको करण्यात आले होते. तेव्हा संतप्त जमावाने त्याला तातडीने फाशी देण्याची मागणी देखील केली होती. त्यातच आता अक्षयचा मृत्यू झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा