ब्युरो टीम : उद्योग विभागाच्यावतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, उद्योजक संघटनाचे प्रतिनिधी, पत्रकार, वकील, शिक्षक व डॉक्टर असे २ हजार ५०० च्यावर निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राज्यशासनाने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, राज्यात आलेले नवीन प्रकल्प, झालेली विदेशी गुंतवणूक, निर्माण झालेला रोजगार आणि या माध्यमातून औद्यागिक क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी, उद्योग विभागाची पुढील वाटचाल व राज्यातील नागरिकांसाठी शासनाने जाहिर केलेल्या इतर विभागाच्या महत्त्वाच्या योजनांचीदेखील माहिती देण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या पुणे कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा