Cardamom : वेलची एक, आरोग्यासाठी फायदे अनेक



ब्युरो टीम : भारतीय मसाल्यांमधील एक महत्त्वाचा भाग म्हणून वेलची ओळखली जाते. सुगंधी चवीसाठी ओळखला जाणारा हा एक असा मसाला आहे, जो केवळ तुमच्या जेवणाची चवच वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन वेलची नियमितपणे खात असाल, तर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टिनं विविध फायदे होतात. चला तर, आज आपण याबद्दल जाणून घेऊ.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार, वेलचीमध्ये फायबर असते. त्यामुळे तिचं सेवन केल्यानंतर भूक कमी होते. तसेच चयापचय वाढवण्यास देखील वेलची महत्त्वपूर्ण ठरते. तिच्या सेवनानं कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया वेगानं होते.

पचनसंस्था सुधारण्यास मदत

वेलची पाचक एंझाइम स्त्राव वाढवत असल्यानं अन्नाचं सुरळीत पचन होण्यास मदत होते. रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यानं बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस सारख्या पाचक समस्या दूर होतात. तिचे दाहक विरोधी गुणधर्म पोटाची सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

प्रतिकारशक्ती 

वेलचीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. वेलचीचं नियमित सेवन केल्यानं तुमची प्रतिकारशक्ती वाढते, व तुमचे विविध आजारापासून संरक्षण होण्यास मदत होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने