chandrakant patil : नेता असावा तर असा, कार्यकर्त्याची सर्वतोपरी काळजी घेणारे दादा!


ब्युरो टीम :राजकीय जीवनात काम करणारा व्यक्ती नेता होतो, तेव्हा अनेकदा तो कार्यकर्त्यांना विसरतो. पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे एक वेगळंच व्यक्तीमत्व आहे. समाज हे आपलं कुटुंब मानून नेहमीच काम करत असतात. 

त्यातच कार्यकर्ता म्हणजे जीव की प्राण. त्यांना जपण्यासाठी ते जीवापाड मेहनत घेत असतात. कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला काहीही दुखलं- खुपलं की त्याच्या मदतीला ते धावून जात असताना. अन् केवळ धीर देतात, असं नाही. तर त्याची सर्वप्रकारे काळजी घेत असतात. त्यामुळेच ते आज कोथरूडकरांचे पालक बनले आहेत. 

तर झालं असं; काही दिवसांपूर्वी कोथरुड मधील भाजपा कार्यकर्ते महेश खोपकर यांची लेक शिवन्या शाळेतून घरी परत येत असताना दुर्दैवी अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता; की महेशही हादरुन गेला होता. या अपघातामुळे महेश पूर्ण हतबल झाला होता. कारण आपल्या मुलीवर ओढवलेल्या या कठीण प्रसंगातून तीची सुटका होईल की नाही ही चिंता त्याला सतावत होती.

मात्र, आपल्या कार्यकर्त्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती मिळताच चंद्रकांत दादा मदतीला धावून गेले .अन् शिवान्याचा उपचाराचा सर्व खर्च उचलून, एक मोठा आधार दिला‌. त्यामुळे शिवन्याने देखील या संकटाला धैर्याने आणि आत्मविश्वासाने तोंड दिले‌‌. आणि आज तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे, हे पाहून दादांनी देखील मोठे समाधान व्यक्त केले. 

आज दादांनी तिची घरी जाऊन भेट घेतली, तेव्हा तिनेही दादांचे स्वागत जय श्रीरामने केले. यावेळी तिच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू  सर्वांनाच आनंद देणारं होतं. तिच्याशी गप्पा मारताना दादा देखील समरस होऊन गेले. तिचं हे निरागसपणे खळखळून हसणं, म्हणजे एका जीवघेण्या लढाईतील विजयाचेच जणू प्रतीक होतं. 

शिवान्या अशीच नेहमी आनंदी राहो, तिला उत्तम आरोग्य लाभो, आणि ती लवकरच आपल्या घरभर बागडताना दिसो, ही दादांनी लाडक्या गणराया चरणी प्रार्थना केली. दादांचे हे वेगळं रुप पाहून सगळेच भारावून गेले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने