crime : मयत अनोळखी इसमाची माहिती कळविण्याचे पोलिसांचे आवाहन



ब्युरो टीम :  रेसिडेन्सिअल हायस्कुल गेटजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या इसमाबाबत माहिती देण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन यांनी केले आहे.

सदर इसम अनोळखी ६० वर्षे असलेला, सावळा रंग, ५ फुट २ इंच उंची, केस काळे,पांढरे, नाक सरळ असून अंगात काळ्या रंगाचे स्वेटर, पांढऱ्या रंगाची शॉर्ट व त्यावर काळ्या व लाल रंगाची डिझाईन आहे . इसमावर उपचार करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.  इसमाच्या मृतदेहाचा पंचासमक्ष पंचनामा करण्यात येऊन नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांचा शोध न लागल्याने तसेच मृतदेह डीकंपोझ होत असल्याने ११ सप्टेंबर रोजी सरकारी खर्चात अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. मयतबाबत माहिती मिळाल्यास तोफखाना पोलीस स्टेशन दूरध्वनी क्र. ०२४१-२४१६११८  वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने