Jammu Kashmir Election 2024 :जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू, मतदारांच्या लागल्या रांगा



ब्युरो टीम : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज, १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी सात वाजल्यापासून तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. येथे मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. दरम्यान, येथे तिसऱ्या व अंतिम टप्प्यात ७ जिल्ह्यातील ४० जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात दोन उपमुख्यमंत्र्‍यांसह ४१५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

निवडणूक आयोगाने मतदानासाठी २० हजाराहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात केले आहेत. या टप्प्यात ३९.१८ लाख मतदार ५०६० मतदान केंद्रावर आपले मतदान करतील.  मतदानादरम्यान सुरक्षेसाठी कडक व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.



या मतदारसंघात होत आहे मतदान

बिश्नाह-एससी, सुचेतगड-एससी, आरएस पुरा, जम्मू दक्षिण, बाहु, जम्मू पूर्व, नगरोटा, जम्मू पश्चिम, जम्मू उत्तर, अखनूर-एससी आणि छंब, बानी, बिलावर, बसोहली, जसरोटा, कठुआ-एससी आणि हीरानगर, उधमपुर पश्चिम, उधमपुर पूर्व, चेनी आणि रामनगर-एससी आणि रामगढ़-एससी, सांबा आणि विजयपुर, करनाह, त्रेघम, कुपवाड़ा, लोलाब, हंदवाड़ा आणि लंगेट, सोपोर, रफियाबाद, उरी, बारामुल्ला, गुलमर्ग, वागूरा-क्रीरी आणि पट्टन, सोनावारी, बांदीपोरा, गुरेज ( एसटी) मतदान होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने