job update : पिंपरी चिंचवड आय.टी.आय. येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती मेळाव्याचे आयोजन


ब्युरो टीम: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्था, यमुना नगर, पिंपरी चिंचवड येथे २७ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

शिकाऊ  उमेदवारी योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना  आहे. देशपातळीवरील आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी हा जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 

या मेळाव्यास आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवार, एमसीव्हीसी बायफोकल उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी  तसेच यापूर्वी उत्तीर्ण झालेले परंतु, शिकाऊ उमेदवारी न मिळालेले प्रशिक्षणार्थी व इतर १२ वी, पदविकाधारक, पदवीधारक व  पदव्युत्तर अशा नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार डी. एन. गडदरे तसेच प्राचार्य एस. डी. साबळे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने