Modi Pune Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, 'या' कारणामुळे घेतला मोठा निर्णय



ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२६ सप्टेंबर २०२४) पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन होणार होते. यासह एकूण बारा प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार होते. यानिमित्ताने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार होती. परंतु आता ती पुढे ढकलली जाणार असून लवकरच ती जाहीर होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने