pimpri chinchwad : प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रात वाहनधारकांच्या सेवेसाठी लघु संदेश सेवा कार्यान्वीत


ब्युरो टीम : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन  कार्यक्षेत्रात  वाहनधारकांना वाहनावरील चलनाचा दंड भरणे, थकीत कर भरणे, परवाना नुतनीकरण, योग्यता प्रमाणपत्र  व नुतनीकरण अशा विविध कामकाजांची  माहिती देण्यासाठी लघु संदेश सेवा कार्यान्वीत करण्यात आली आहे.  

लघु संदेश सेवा अंतर्गत  वाहनधारकास  सीपी-आरटीओपीसीएम (CP-RTOPCM)  या नावाने लघु संदेश (SMS) जाणार असून या संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कार्यालयाचे इंग्रजी व मराठी स्वरुपातील मागणीपत्र नागरिकांना पाहता येणार आहे, असेही  पिंपरी चिंचवडचे  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने