Pitrupaksha Shraddha :पितृपक्षाला सुरुवात झालीय, जाणून घ्या श्राद्ध तिथी



ब्युरो टीम : हिंदू धर्मात पितृपक्षाला खूपच महत्त्व आहे. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध विधी याकाळात केला जातो. यंदा गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर २०२४ रोजी पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. तर, पितृ पक्षाची समाप्ती २ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. 

पितृ पक्षात पितरांचे श्राद्ध केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. पितृ पक्षात अनेकजण त्यांच्या पूर्वजांच्या मृत्युतिथीनुसार त्यांचे श्राद्ध करतात. चला तर, यंदाच्या वर्षी पितृ पक्षातील श्राद्ध तिथी नेमक्या कोणत्या आहेत, ते आज आपण जाणून घेऊ.

अशा आहेत श्राद्ध तिथी

पितृपक्ष सुरुवात व पौर्णिमा श्राद्ध तिथी - १७ सप्टेंबर 

प्रतिपदा श्राद्ध तिथी - १८ सप्टेंबर 

द्वितीया श्राद्ध तिथी - १९ सप्टेंबर

तृतीया श्राद्ध तिथी - २० सप्टेंबर

चतुर्थी श्राद्ध तिथी - २१ सप्टेंबर

पंचमी श्राद्ध तिथी - २२ सप्टेंबर

षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध तिथी - २३ सप्टेंबर

अष्टमी श्राद्ध तिथी - २४ सप्टेंबर

नवमी श्राद्ध तिथी - २५ सप्टेंबर

दशमी श्राद्ध तिथी - २६ सप्टेंबर

एकादशी श्राद्ध तिथी - २७ सप्टेंबर

द्वादशी श्राद्ध तिथी - २९ सप्टेंबर

त्रयोदशी श्राद्ध तिथी - ३० सप्टेंबर

चतुर्दशी श्राद्ध तिथी - १ ऑक्टोबर

सर्व पितृ अमावस्या व पितृ पक्षाची समाप्ती - २ ऑक्टोबर

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने