pune traffic change : उद्या पुण्यात येत आहात? मग वाचा पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काय करण्यात आलाय वाहतूकीत बदल



ब्युरो टीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने २६ सप्टेंबर रोजी तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट व पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त कार्यालयाच्यावतीन जारी करण्यात आले आहेत. 

पुणे शहरातील दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर), सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती, सणस पुतळा चौक ते पूरम चौक, स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार, नाथ पै चौक ते अलका चौक, अलका चौक ते भिडे जंक्शन व व्हीव्हीआयपी पार्किंग हे ड्रॉप पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. 

शहरातील भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून), निलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग व पीएमपीएल मैदान पूरम चौक या ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी निश्चित  करण्यात आल्या आहेत.

समारंभाला येणाऱ्या बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड व शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली  आहे. 

खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- सेनादत्त पोलीस चौकी- उजवीकडे वळण घेवून म्हात्रे पूल डावीकडे डी.पी. रोड, सावरकर चौकामधून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल- उजवीकडे वळण घेवून डी. पी. रोड, सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल-सावरकर पुतळा-मित्रमंडळ चौक- व्होल्गा चौक-सातारा रोड मार्केट यार्ड जक्शन वरून शिवनेरी रोड असे बसेस पार्किंग मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी ड्रॉप पॉईंटच्या ठिकाणी उतरावे व त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहनही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने