Pune : आ. सिद्धार्थ शिरोळे .. तुमच्या पुरस्काराचा सर्वसामान्य मतदारांना काय फायदा ? शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचा अंतर्गत कलह उघड ?


ब्युरो टीम : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘उत्कृष्ठ भाषण’ पुरस्कार नुकताच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना देण्यात आला. परंतु पुरस्कार मिळताच शिवाजीनगर भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल आहे. शिरोळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मतदारसंघात अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत.  आता त्याचा फ्लेक्सच्या खाली मिळालेल्या पुरस्काराचा शिवाजीनगर मतदारसंघातील स्थानिक नागरिकांना काय फायदा झाला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

मतदारसंघात लागलेल्या अभिनंदनासाठी लागलेल्या  ‘आमचा आमदार वक्ता दमदार’ या फ्लेक्च्या खाली ‘ भाषणाने पुरस्कार तर भेटला, मग शिवाजीनगरमध्ये वाहतुकीचा प्रश्न का दाटला’ अशा आशयाचे फ्लेक्स लावत लावले आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात वाहतुकीच्या उडालेल्या बोजावऱ्याबद्दल स्थानिक नागरिकांनी या फेक्सच्या माध्यमातून शिरोळेवर निशाणा साधला आहे,अशी चर्चा सुरू आहे.

वाढदिवसानिमित ‘या’ नेत्याच्या मागे विधानभवनाची प्रतिकृती 

पुढील आठवड्यात पुणे महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी व शिवाजीनगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सवर विधानभवनाची प्रतिकृती लावली आहे. यामुळे या नेत्याने देखील विधानसभेची तयारी सुरु केल्याची चर्चा मात्र यानिमित्ताने मतदारसंघात सुरु झाली आहे.  कार्यकर्त्यांनी दिलेल्या या हटके शुभेच्छामुळे शिवाजीनगर भाजपातील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. 

२०१४ मध्ये भाजपचे उमेदवार विजय काळे हे मोदी लाटेत प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते, मात्र २०१९ विधानसभेवेळी आमदार विजय काळे यांचे तिकीट कापून तत्कालीन नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना शिवाजीनगर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या विरोधात लढताना सिद्धार्थ शिरोळे हे अवघ्या ५ हजारांच्या मताधिक्याने आमदार निवडून आले होते. तर, भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांना अवघ्या ३ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. तेव्हापासून शिवाजीनगर मतदारसंघ भाजपच्या हातून निसटत असल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आपला बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी आत्ताच उपाय योजना करणे गरजेचे आहे. अन्यथा भाजप अंतर्गत कलहाचा फटका आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाला बसेल,  अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने