Run for pune :जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी 'रन फॉर फोर्ट' मॅरेथॉन



ब्युरो टीम: छत्रपती शिवाजी महाराजांचे 'मराठा लष्करी भूप्रदेश'अंतर्गत जिल्ह्यातील  शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या अनुषंगाने पुणे जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'रन फॉर फोर्ट' मॅरेथॉन स्पर्धेचे २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे; या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. 

याअनुषंगाने यूनेस्कोची समिती २७ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ल्यांना भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. 

'चला होऊ जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार' मोहिमेअंतर्गत आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेला फर्ग्युसन महाविद्यालय येथे शुभारंभ होणार आहे. बीएमसीसी रस्ता- सेनापती बापट रस्ता- कुसाळकर रस्ता-दीप बंगला चौक- कॅनाल रस्ता - एफसी रस्ता मार्गे फर्ग्युसन महाविद्यालय येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  'क्यूआरकोड'द्वारे ऑनलाईनपद्धतीने विनामूल्य नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने