sanskrutik vartapatra : सांस्कृतिक वार्तापत्र दिवाळी अंक नोंदणीसाठी आवाहन




ब्युरो टीम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघशताब्दीनिमित्त सांस्कृतिक वार्तापत्र यावर्षी 'रा. स्व. संघ माणूस घडवणारी संघटना' हा दिवाळी अंक प्रकाशित करी आहे. 

माणसात माणूसपण सद्गुणांमुळे निर्माण होते, ते सद्गुण संघात कसे रुजवले जातात? आपले सर्वस्व भारतमातेच्या चरणी समर्पित करण्याची वृत्ती संघ स्वयंसेवकात कशी निर्माण होते? करियर म्हणजे केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळवणे एवढेच नाही, तर सद्गुणांची जोपासना हा सुध्दा करियरचाच एक भाग असतो, ते संघात कसे जोपासले जातात? याची उत्तरे या दिवाळी अंकामध्ये मिळणार आहेत. 

या अंकाची नोंदणीची अंतिम तारीख १ ऑक्टोबर २०२४ असून दिवाळी अंकाचे मूल्य 200/-₹ (अधिक रुपये 40/-₹ टपालखर्च) आणि प्रकाशनपूर्व मूल्य 150/-₹ (टपालखर्चासह) इतके आहे. अधिक माहितीसाठी अहिल्यानगर येथील सांस्कृतिक वार्तापत्र प्रतिनिधी श्री. कुलदीप विनायक कुलकर्णी (मोबाईल 7057815253) यावर संपर्क साधावा, आणि आपला दिवाळी अंकाची प्रत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने