singer hariharan : गायक हरीहरन विशाल गणराया चरणी नतमस्तक

 


ब्युरो टीम : संपुर्ण गायन विश्‍वाला आपल्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारे विख्यात गायक हरीहरन हे नगर येथे कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे भेट देऊन महापुजा केली. तसेच त्यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी विशाल गणेशाची भव्य आकर्षक मुर्ती पाहुण प्रसन्न झाले. तसेच या मंदिराविषयीची माहिती त्यांनी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांच्याकडून घेतली. मंदिराच्या कामाबद्दल प्रशंसा व्यक्त केली.

गायक हरीहरन यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे भेट दिली असता त्यांच्या महापूजा करुन आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानच्यावतीने उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, प्रा.माणिकराव विधाते, नितीन पुंड, अर्जुनराव बोरुडे, गणेश राऊत आदी उपस्थित होते. यावेळी हरीहरन म्हणाले की,  ‘मी स्वत: श्री गणेशाचा भक्त आहे  माझी गणेशावर मोठी श्रद्धा आहे. श्री विशाल गणेशाचे नाव संपूर्ण देशात आहे. नगर येथे आल्याबरोबर मी श्री विशाल गणेश मंदिरास भेट दिली. श्री विशाल गणेशाच दर्शन घेतल्यावर व मंदिर पहिल्यावर मन अगदी प्रसन्न झाले.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने