ब्युरो टीम : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज, मंगळवारी (३ सप्टेंबर २०२४) राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसू लागलाय.
गेल्या काही वर्षामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आज आंदोलन पुकारण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सेवा सुरू करावी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही एसटीत मोफत पास सवलत द्यावी, अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा