bjp releases first list :भाजपची पहिली यादी जाहीर अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघातून कोणाला मिळाली संधी?



ब्युरो टीम : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी शिर्डी, श्रीगोंदा व शेवगाव या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे आमदार आहेत. शिर्डी येथे राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव येथे मोनिकाताई राजळे तर श्रीगोंदा येथून बबनराव पाचपुते हे भाजपच्या तिकिटावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील तर शेवगाव येथून मोनिकाताई राजळे यांना पुन्हा उमेदवारी देत भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर, श्रीगोंदा येथून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

याशिवाय राहुरी येथून शिवाजी कर्डिले यांना तर कर्जत-जामखेड मतदारसंघातून प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे पहिल्या यादीतील उमेदवार :

शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील

शेवगाव : श्रीमती मोनिका राजळे

राहुरी : शिवाजी कर्डिले

श्रीगोंदा : श्रीमती प्रतिभा पाचपुते

कर्जत-जामखेड : प्रा. राम शिंदे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने