chandrakant patil : चंद्रकांत पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला



ब्युरो टीम : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना अधिकृत उमेदवारी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपकडून जाहीर झाली आहे. आज, २२ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २४ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करीत चंद्रकांत पाटलांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 


चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ‘माझे मायबाप कोथरुडकर यांच्या आशीर्वादामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी कोथरुडकरांच्या साथीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहे. तुमच्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करायला अवश्य या, ही नम्र विनंती!’

‘गुरुवार, २४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड येथे आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने सहभागी व्हा,’ असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने