ब्युरो टीम : आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी हा सर्वात मोठा सण. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आज, वसुबारस (२८ ऑक्टोबर) पासून दिवाळीला प्रारंभ झाला असून, यंदा ३ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या दीपोत्सवासाठी सर्वचजण सज्ज झाले आहेत.
सुख-समृद्धीचे प्रतिक असलेला हा सण साजरा करीत असताना घरात व अंगणात दिवे लावताना, विद्युत रोषणाई करताना वास्तुशास्त्रानुसार थोडी काळजी घेण्याची गरज आहे. आचार्य संदीप कुलकर्णी (MA - ज्योतिष) यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. चला तर, दिवाळीला दीपप्रज्वलन करताना दिव्याचे तोंड कोणत्या दिशेने कराल ? याबाबत जाणून घेऊ.
दिवाळीला दीपप्रज्वलनाचे विशेष महत्त्व आहे. कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी देवीची आणि श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवशी घरात कुठेही अंधार नसावा, अन्यथा लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही, अशी मान्यता आहे. अशीच श्रद्धा दिवा लावण्याची पद्धत याबाबत जोडली आहे. घरात, अंगणात लावण्यात येणारे दिवे वास्तुनुसार योग्य नसल्यास ते शुभ मानले जात नाही.
काय आहे दिवे लावण्याची योग्य पद्धत :
- दक्षिणेकडे दिव्याचे तोंड करून कधीही दिवा लावू नका, कारण तो अशुभ आहे.
- दिवाळीला शुद्ध तुपाचे दिवे लावावेत. यामुळे घरात समृद्धी येते.
- दिवा लावण्यासाठी कधीही सूर्यफूलाचे तेल वापरू नका.
- दिव्याची वात इतकी लांब असावी की जेणेकरून आग दिव्याच्या मध्यभागी जाणार नाही.
- नेहमी देवघरातून दिवे लावायला सुरुवात करा.
- दिवाळीच्या दिवशी घरातील लक्ष्मी आणि गणेशाचे स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावा.
चला तर, या दिवाळीला योग्य पद्धतीने दिवे लावून हा सण आनंदाने व उत्साहात साजरा करा.
टिप्पणी पोस्ट करा