ब्युरो टीम : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून लोकसभा निवडणुकीनंतर या दोन राज्यातील जनता कोणाच्या हातात सत्ते देते याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही राज्यात विधानसभेच्या प्रत्येकी ९० जागा असून बहुमतासाठी लागणारी ४५ ही फिगर कोण गाठणार हे पुढील काही तासात स्पष्ट होणार आहे.
आगामी काळात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या अनुषंगाने देखील हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत हरियाणा राज्यात भाजपनं मुसंडी मारली आहे. तर, जम्मू मध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.
टिप्पणी पोस्ट करा