ब्युरो टीम : हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत. हरियाणात भाजपाला बहुमत मिळाले असून तिसऱ्यांदा हरियाणात भाजपाची सत्ता आली आहे. तर, जम्मू काश्मीरमध्ये नॅशन कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं आहे
हरियाणा विधानसभा निवडणुकीत ९० जागांपैकी एकूण ४९ जागा जिंकून भाजपने बहुमत मिळवत सत्तेची हॅटट्रिक पूर्ण केली. हरियाणा राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. येथे सरकारच्या विरोधातील नाराजी लोकसभा निवडणुकीत दिसून आली होती. तसेच शेतकरी, खेळाडू, अग्निवीर यांच्यावरून देखील सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. मात्र, त्यानंतरही भाजपाला हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत चांगलेच यश मिळाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा