ब्युरो टीम : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना आज, पहाटेच्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी ८३ वर्षीय पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर नाशिकच्या एका रुग्णायलयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. सध्या पिचड कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत.
मधुकरराव पिचड यांनी १९८० ते २००४ या काळात नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा काम केले आहे. मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, परंतु २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. आज सकाळी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टिप्पणी पोस्ट करा