ब्युरो टीम : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. निवडणूक जाहीर होताच महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चला तर त्याबाबतच जाणून घेऊ.
देवेंद्र फडणवीस म्हणतात...
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय...
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2024
दिवाळीत प्रकाश पर्व असेल !
आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू!
भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले.
चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या,
आणि 23 नोव्हेंबरला… https://t.co/j4nAq2CTMt
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून आचारसंहितेला सुरुवात देखील झाली आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने 2014 व 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली होती. मला खात्री आहे, यंदा देखील भारतीय जनता पार्टी सह महायुती न भूतो न भविष्यती अशी कामगिरी या विधानसभा निवडणुकांमध्ये करेल. महाविकास आघाडीचा खोटा नॅरेटिव्ह आम्ही महायुती सरकारची विकास कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून खोडून काढणार आहोत. मला विश्वास आहे, या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करून पक्षाचा विचार व सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवेल व पुन्हा एकदा विकासाभिमुख महायुती सरकार महाराष्ट्रात आणण्यास आपले योगदान देईल. माझे जनतेला देखील आवाहन आहे की, लोकशाहीच्या या पर्वात आपण देखील उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून आचारसंहितेला सुरुवात देखील झाली आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 15, 2024
आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात…
अजित पवार म्हणतात...
मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आता निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया. जय महाराष्ट्र!
मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक… pic.twitter.com/xRD2s1gcia
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 15, 2024
पहा निवडणूक आयोगाची संपूर्ण पत्रकार परिषद
टिप्पणी पोस्ट करा