maharashtra election : निवडणूक काळात ध्वनीक्षेपकाच्या वापरास निर्बंध



ब्युरो टीम : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी   निवडणूक कालावधीत निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंधाचे आदेश निर्गमित केले आहेत.

ध्वनीक्षेपकाचा वापर संबंधित पोलीस विभागाच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत कोणत्याही क्षेत्रात तसेच फिरत्या वाहनांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकिय पक्ष, उमदेवार व इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. ध्वनीक्षेपकाचे वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.आदेशाचा भंग करण्याऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने