maharashtra election : 'या'जिल्ह्यात भरणार "लोकशाहीची शाळा", वाचा काय आहे प्रकार?



ब्युरो टीम : अहिल्यानगर जिल्ह्यात  येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीतून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ  यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्यावतीने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर "लोकशाहीची शाळा" या लोकउत्सवाचे  १० ते १७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

उत्कृष्ट उपक्रम राबवणाऱ्या शाळा महाविद्यालयांना " लोकशाहीची शाळा " या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.  १० ऑक्टोबर २०२४ रोजी  ईव्हीएम डे आयोजित करताना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन विषयक जनजागृती,११ ऑक्टोबर - पोलिंग बुथ डेच्या माध्यमातून मतदान केंद्राची अंतर्गत व बाह्यरचना जनजागृती, १४ ऑक्टोबर-फॅसिलिटी डेच्या आयोजनाद्वारे मतदान केंद्रांवर पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांबाबत जनजागृती, १५ ऑक्टोबर - पोल डेद्वारे  शाळेतील वर्गांमधून मॉनिटर व इतर वर्ग प्रतिनिधींची वर्गांतर्गत निवडणुकीतून व अभिरूप मतदानातून निवड करणे, १६ ऑक्टोबर - डी फॉर डेमोक्रसी डान्स डे आयोजित करून भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी प्रसारित केलेल्या दोन गीतांवर नृत्य सादरीकरण, १७ ऑक्टोबर -पॅरेंट डे द्वारे  पालक मेळाव्यातून लोकशाहीत पालकांच्या सहभागाबाबत जनजागृती, मतदार जनजागृती शपथ घेण्यात येईल 

वरील सर्व उपक्रम शाळा-महाविद्यालयांनी शक्य तेथे पालकांचा सहभाग घेऊन राबवावयाचे आहेत. उपक्रमांबद्दल तपशीलवार व्हिडिओ, पोस्टर्स, गाणी, पीडीएफ तसेच अधिकृत माहिती भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी - महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळ, समजमध्यामे , यूट्यूब चॅनेलवर किंवा अहमदनगर स्वीप व्हाट्सअप केअर ९००२ १० ९००३ या क्रमांकावर संदेश पाठवून मिळेल. उपक्रमाचे वर्तमानपत्रांमध्ये वृत्तांकन करून फोटो, व्हिडिओ,वृत्तपत्र कात्रणे वरील व्हाट्सअप क्रमांकावर २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवावेत. सहभागी सर्व शाळांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असे स्वीप समन्वयक यांनी कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने