Maharashtra politics : आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे सात नेते होणार आमदार



ब्युरो टीम : राज्यातल्या विधानसभेसाठी आज, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. तर,  दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही सुरू झाली आहे. आज, दुपारी १२ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलला सात आमदारांचा शपथविधी होणार आहे.  विधीमंडळतात उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. सध्या  विधीमंडळात शपथविधीची तयारी सुरू आहे. 

भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येत आहे.  राष्ट्रवादीकडून  पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. आज हे सातही आमदार शपथ घेणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने