Mahayuti :अखेर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला! महायुतीत भाजप असणार मोठा भाऊ, वाचा कोणाला किती जागा मिळणार?


ब्युरो  टीम : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज, मंगळवारी (१५ ऑक्टोबर) दुपारी ३.३० वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार महायुतीत भाजप सर्वात मोठा भाऊ असणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'महायुतीमध्ये ९५ टक्के जागांवर एकमत झाले आहे. उरलेल्या ५ टक्के जागांचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा नसेल. तर,  विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप १५८ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. भाजपखालोखाल सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता असून शिवसेनेला ७० ते ७५ जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने