ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (३ ऑक्टोबर २०२४) रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी... एवढ्या जगात माय मानतो मराठी!’
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 3, 2024
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी!
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी घेतला. महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार असा हा निर्णय…
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार देखील मानले असून त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी घेतला. महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार असा हा निर्णय आहे. आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवाच्या शुभप्रसंगी माय मराठीला मिळालेला अभिजात दर्जा हा संपूर्ण महाराष्ट्राचा, येथील संत परंपरेचा, साहित्याचा आणि मराठी बोलणाऱ्या प्रत्येकासह महाराष्ट्रातील जनतेचा सन्मान आणि अभिमान वाढविणारा आहे.’
‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतानापासून सातत्याने पाठपुरावा करत होते. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्यासह महायुती मधील सर्वांनी, मराठी भाषा अभ्यासकांनी, संशोधकांनी मराठीच्या सन्मानासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय दीपस्तंभ सारखा ठरणार आहे,’ असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.
माय मराठी आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारा या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतानाच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा