Marathi Classical Language : मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, 'सर्वज्ञात मराठी, अभिजात मराठी....’



ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (३ ऑक्टोबर २०२४) रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. 

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘शिवरायांची मराठी.. ज्ञानेश्वरांची मराठी... तुकोबांची मराठी... बहिणाबाईंची मराठी... सर्वज्ञात मराठी, अभिजात मराठी....’ 


मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार देखील मानले असून त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे की, ऐतिहासीक दिवस! आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. या स्वागतार्ह निर्णयासाठी तसेच माय मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री श्री.अमितभाई शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री.गजेंद्रसिंह शेखावतजी यांचे मनःपूर्वक आभार.’

दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून केंद्र सरकारचे आभार मानले जात आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने