ब्युरो टीम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे नेते अमित राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी मनसेकडून मतदारसंघही निश्चित करण्यात आला आहे. ते माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत अमित ठाकरे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी खालीलप्रमाणे....#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/gmBAIzsfRb
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2024
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच आता सर्वत्र राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी घोषित केल्या जात आहेत. मनसेने देखील त्यांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमित ठाकरे यांचेही नाव आहे.
याशिवाय मनसेकडून प्रमोद पाटील यांना कल्याण ग्रामीण, शिरीष सावंत यांना भांडूप पश्चिम, संदीप देशपांडे यांना वरळी, अविनाश जाधव यांना ठाणे शहर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेच्या पहिल्या यादीत ४५ जणांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा