mukhyamantri tirth yatra yojana :'या' जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत विशेष रेल्वेने अयोध्येकडे



ब्युरो टीम : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८०० यात्रेकरू  १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून रेल्वेने श्रीराम मंदिर आयोध्या कडे रवाना होणार असून त्यांचा १० ते १४ ऑक्टोबर असा हा प्रवास असणार आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. 

या कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाज कल्याण आयुक्त यांच्या उपस्थितीत पुणे रेल्वे स्थानकावर या यात्रेकरूंच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ होणार आहे. 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातून ही पहिली भाविकांची रेल्वे अयोध्येसाठी रवाना होत आहे. ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असून या यात्रेत ७२९ नागरिक आणि ७१ सहायक असे ८०० यात्रेकरू असणार आहेत. या योजनेअंतर्गत सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यात आली असल्याचेही कळविण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने