Navratri : मोहटादेवी यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ, खासदार नीलेश लंकेंची संकल्पना



ब्युरो टीम : खासदार नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून गेल्या आठ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या नवरात्र यात्रोत्सवास शुक्रवारी मोठया उत्साहात प्रारंभ झाला. खा. लंके व राणीताई लंके तसेच नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्यानंतर हंगे शिवारातून शेकडो बसेस मोहटादेवीकडे रवाना झाल्या. 

शुक्रवारी सकाळी हंगे शिवारात एमआयडीसी लगतच्या मैदानावर सुपा गटातील विविध गावांच्या बसेस एकत्रीत झाल्या. प्रत्येक बसेसमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आल्यानंतर या बसेस मोहटादेवीकडे रवाना झाल्या. दुसऱ्या माळेच औचित्य साधून यात्रेत सहभागी झालेल्या महिलांना हिरव्या रंगाच्या साडया परिधान केल्या होत्या. यात्रेत सहभागी झालेल्या बसेसमध्ये अग्रभागी असलेल्या बसची फुलांनी सजावट करण्यात आली होती. खा. लंके व राणीताई लंके यांनी या बसेसला हिरवा झेंडा  दाखविल्यानंतर बसेसचे प्रस्थान झाले. 

यावेळी दिपक पवार, विजय पवार, सचिन पवार, सचिन पठारे, बाळासाहेब यादव, सुवर्णा धाडगे, संग्राम इकडे, बंडू साबळे, भाऊसाहेब भोगाडे, दौलत गांगड, डॉ. अजिंक्य गवळी, बबनराव गवळी, विकास म्हस्के, राजेंद्र दळवी, राजेंद्र शिंदे, प्रकाश गुंड, ज्ञानदेव जगताप, जालींदर काळे, पुनमताई मुंगसे, सतिश भालेकर, अमोल यादव, कारभारी पोटघन, संजय तरटे, लकी कळमकर, राजू शेळके, संदीप मगर, दादा शिंदे, दत्ता दिवटे, संदीप वाघमारे, अरूण कळमकर, गोरख उबाळे, कांतीलाल भोसले, संतोष तरटे, दिलीप गुंड, सचिन साठे, सुधीर लाकूडझोडे, विपुल सावंत, संतोष ढवळे, अक्षय थोरात, अमोल पवार यांच्यासह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

तिसगांव येथे फराळाची व्यवस्था 

मोहटादेवी यात्रोत्सवामध्ये सहभागी झालेल्या महिलांसाठी प्रवासादरम्यान तिसगांव येथे फराळाची व्यवस्था करण्यात आली असून खा. नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके हे  तेथील व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहेत. 

यात्रेसोबत रूग्णवाहिका 

यात्रेदरम्यान महिलांमध्ये  आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास यात्रेसोबत डॉक्टरांची टीम असलेली रूग्णवाहिका तैनात असून त्रास होणाऱ्या महिलेवर तात्काळ उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने