ब्युरो टीम : सोमेश्वर फाउंडेशन व स्व. आ. विनायक (आबा) निम्हण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक सनी निम्हण यांचा संकल्पनेतून भव्य भक्तिरंग शारदीय महिला भजन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात रंगलेल्या या भक्तिरंग स्पर्धेत खडकी येथील अंजली भजनी मंडळाने आपल्या गायनाने सर्वाना मंत्रमुग्ध करत प्रथम क्रमांक मिळवला.
स्व. आमदार विनायक आबा निम्हण यांच्या सामाजिक, धार्मिक कार्याचा वारसाच आपला वसा म्हणून पुढे घेऊन जाणारे माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवानिमित्त सोमेश्वर फाउंडेशन व स्व. आ. विनायक (आबा) निम्हण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शारदीय महिला भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. श्री रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर गावठाण येथे घेण्यात आलेल्या या शारदीय भजन स्पर्धेला पुणे शहरातील महिला भजनी मंडळांनी उत्तम प्रतिसाद देत सहभाग घेतला होता. या भक्तीमय सोहळा अनुभवण्यासाठी महिलावर्गाने मोठी गर्दी केली होती.
शिवाजीनगर भागातील जंगली महाराज भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक मिळवला. सुतारवाडी येथील जोगेश्वरी महिला मंडळ व शिवाजीनगर भागातील काशी विश्वनाथ महिला मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. यावेळी उत्कृष्ठ हार्मोनियम वादक, उत्कृष्ठ मृदंग वादक व उत्कृष्ठ महिला मृदंग वादक अशी पुरस्कार देत वयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
या भक्तिमय स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्या महिला मंडळांचा सन्मान करण्यासाठी मधुराताई सनी दादा निम्हण, ह. भ. प. शांताराम महाराज निम्हण , ह.भ.प. पांडुरंग अप्पा दातार, ह. भ. प. मारुती कोकाटे , ह. भ. प. बबनराव हेगडे, ह. भ. प. बाळासाहेब सुतार , ह. भ. प. तोलबा सुतार, ह. भ. प. हरिभाऊ गुजर इ. मान्यवर उपस्थित होते.
भक्तिमय स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून धनंजय वसवे, धनंजय भोंडे, नितीन निम्हण यांनी काम पाहिले. अशी भक्तिमय स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सर्व महिला वर्गाने समाधान व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा