ब्युरो टीम : मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या लोकअदालतीसाठी पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी (ऑनलाईन) पद्धतीने सहभागी होऊ शकतात असेही त्यांनी कळविले आहे.
या विशेष लोक अदालतीत मुंबई उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेले खटले पुणे विधी सेवा प्राधिकरण येथून ऑनलाईन पद्धतीने तडजोडीने मिटविण्याची संधी प्राधिकरणाने उपलब्ध करून दिली आहे
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे येथे प्रलंबित आहे व ती तडजोडीने मिटवावीत, अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी संबंधीत वकीलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा