South Indian Actress Shanvi Srivastava : दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तवचे मराठी चित्रपटात पदार्पण, इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत म्हणाली...



ब्युरो टीम : मराठी मनोरंजन विश्वात सध्या समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या चित्रपटामध्ये तगडे स्टारकास्ट आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्तानं दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल मराठीत एन्ट्री करणार असल्याचे समोर आलंय. शान्वी श्रीवास्तव असे या अभिनेत्रीचे नाव आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

शान्वीने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘रानटी' या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. सोबतच दिग्दर्शक समित कक्कड यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही कमालीचा असल्याचे ती म्हणाली.


कोण आहे शान्वी?

शान्वी श्रीवास्तव हिने आतापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेत चांगलंच नाव कमवलं आहे. शान्वीने २०१२ मध्ये तेलुगू चित्रपट 'लव्हली'द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'अड्डा','प्यार में पडीपोयने', 'भले जोडी','मुफ्ती','चंद्रलेखा' यासारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. आता ती 'रानटी' चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून, तिच्या पात्राचे नाव मैथिली असे आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी हा मराठी अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने