ब्युरो टीम : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज, सोमवारी (१४ ऑक्टोबर २०२४) तब्येत बिघडली असून त्यांना विविध तपासण्या करण्यासाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे शिवसैनिकांची काळजी वाढली होती. त्यातच आता उद्धव ठाकरेंची प्रकृती कशी आहे? याबाबत त्यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे.
This morning, Uddhav Thackeray ji did a pre planned detailed check up at the Sir HN Reliance Hospital.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 14, 2024
With your best wishes, All is well, and he is fully ready to get to work and serve the people.
आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आज सकाळी उद्धव ठाकरे यांची सर एचएन रिलायन्स रुग्णालायत पूर्व नियोजित तपशीलवार तपासणी करण्यात आली. तुमच्या शुभेच्छांसह सर्व काही ठीक आहे. ते काम करण्यास आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहेत.’
Former Maharashtra CM Uddhav Thackeray admitted to HN Reliance Hospital for a routine checkup for his previous medical history. He is likely to be discharged later today: Shiv Sena (UBT) sources
— ANI (@ANI) October 14, 2024
(File photo) pic.twitter.com/1IOKws2pIf
दरम्यान, दोनच दिवासंपूर्वी म्हणजे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात संबोधन केले होते. तर, काल रविवारी मुंबईत विविध कामगार संघटनांची बैठक झाली होती. या बैठकीत शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी नेत्यांसह उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला देखील उद्धव ठाकरे उपस्थित होते. मात्र , सोमवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडली.
टिप्पणी पोस्ट करा