ब्युरो टीम : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या ३२३.२५ ब्रास वाळू साठ्यांचा लिलाव अटी व शर्तीच्या अधिन राहून ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ४ वाजता तहसिल कार्यालय कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन तहसिलदार गुरु बिराजदार यांनी केले आहे.
लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय कर्जत येथे उपलब्ध असल्याचेही कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा