ब्युरो टीम : ऑक्टोबर महिन्यापासून थंडीचा ऋतू सुरू होतो. ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा आठवडा सुरू झाला असून आता हळूहळू हवेतील गारवा ही वाढू लागला आहे. खरंतर थंडीच्या ऋतूमध्ये स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात उत्तम आहार घेतल्यानं आरोग्यासाठी खूप फायदा होतो.
थंडीचा ऋतू सुरू झाला की अनेकजण निरोगी राहण्यासाठी आहारात अनेक गोष्टींचा समावेश करतात. हिवाळ्यात जर तुम्ही तुमच्या आहारात बाजरीचा समावेश केला, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बाजरी ही उष्ण असते, त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस, फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स त्यात आढळतात. जे आरोग्याला अनेक फायदे प्रदान करतात. त्यामुळेच थंडीच्या दिवसात आहारात बाजरीचा समावेश करणे गरजेचे आहे. आहारात बाजरीचा समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
हाडे मजबूत होतात
बाजरीत भरपूर कॅल्शियम आढळते. जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते.
शरीराचे तापमान
आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराला ऊब मिळते. त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
खराब कोलेस्ट्रॉल कमी होते
बाजरीत नियासिन नावाचे व्हिटॅमिन देखील असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
रक्तदाब नियंत्रित राहतो
बाजरीत पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
टिप्पणी पोस्ट करा